pik vima yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pik vima yojana जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 27 महसूल मंडळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पावसाच्या खंडामुळे अधिसूचना काढण्यात आली होती. या अधिसूचना काढलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोबतच केळीचा पिक विमा हा दिवाळी पूर्वीच वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती खासदार मनोज पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली होती.

जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यातील एकूण 27 महसूल मंडळातील 1 लाख 43 हजार शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून 76 कोटी 40 लाख रुपयांच्या पिक विमाच वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे.

pik vima yojana

पीक विमा यादी पाहा

अग्रिम पिक विमा जळगाव

  • जळगाव जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडला होता.
  • ज्यामध्ये अमळनेर आणि चाळीस तालुक्यामधील महसूल मंडळामध्ये याचा मोठा परिणाम दिसून आला होता.
  • जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हा तालुका यापूर्वीच गंभीर स्वरूपाच्या दुष्काळामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे.
  • या तालुक्यामधील जवळजवळ 56 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना देखील 25% अग्रिम पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे.
  • जळगाव जिल्ह्यातील 27 महसूल मंडळामध्ये कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका, ज्वारी आणि बाजरी या पिकाच्या उत्पादनामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आदेशनाकडून 60 ते 80% पर्यंतचे घट दाखवण्यात आली होती.
  • या 27 महसूल मंडळामध्ये पिक विमाच वाटप सुरू करण्यात आले आहे.
  • अमळनेर तालुक्यातील 49,783 शेतकऱ्यांना 76 कोटी 14 लाख 17 हजार रुपयांचे नुकसान भरपाई अग्रिम पिक विम्याची दिली जाणार आहे.

पीक विमा अग्रीम 161 कोटीच वाटप

pik vima yojana अग्रिम पिक विमा जळगाव

  • भडगाव जिल्ह्यातील एकूण 18 हजार 174 शेतकरी पात्र करण्यात आले आहे.
  • ज्यांसाठी 8 कोटी 8 लाख 88 हजार रुपये पिक विमा वितरित केल्या जाणार आहे.
  • चाळीसगाव तालुक्यामध्ये 56 हजार 951 शेतकरी पात्र करण्यात आले आहे.
  • ज्यासाठी 24 कोटी 34 लाख 76 हजार रुपयांचे नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
  • धरणगाव तालुक्यामधील 11 हजार 102 शेतकऱ्यांना 5 कोटी 49 लाख 3 हजार रुपयाचे वितरण केले जाणार आहे.
  • मुक्ताईनगर तालुक्यातील 565 शेतकऱ्यांना 20 लाख 31 हजार रुपये नुकसान भरपाई अग्रीम पिक विमा दिली जाणार आहे.
  • रावेर तालुक्यामधील 2 हजार 191 शेतकरी पात्र करण्यात आले असून यांना 88 लाख 4 हजार 153 रुपय नुकसान भरपाई अग्रीम पिक विमा दिली जाणार आहे.
  • रावेर तालुक्यामधील 4 हजार 551 शेतकऱ्यांना 1 कोटी 24 लाख 83 हजार रूपये नुकसान भरपाई अग्रीम पिक विमा दिली जाणार आहे.

मागेल त्याला योजना, तुमचं नाव आहे का?

एकूण जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 27 महसूल मंडळातील 1 लाख 43 हजार शेतकऱ्यांना 76 कोटी 40 लाख रुपयांच्या पिक विम्याचे वितरण सुरू झाले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!