Jerenium Farming
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jerenium Farming जगात अश्या अनेक वनस्पती आहे ज्यांच्या उत्पादनांना बाजारपेठेत मोठा दर मिळतो. जिरेनियम ही वनस्पती यापैकीच एक असून सुगंधी उत्पादनांमध्ये या वनस्पतीच्या तेलाला सर्वाधिक मागणी आहे. वापरत असलेल्या दैनंदिन सौंदर्यप्रसाधनांमध्ये जिरेनियम वनस्पतीचे तेल सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते. भारतीय बाजारपेठेत देखील या तेलाला मोठे मागणे असून सध्या जिरेनियम तेलाची गरज भागवण्यासाठी परदेशातून आयात करावी लागते. त्यामुळेच भारतीय शेतकऱ्यांना या पिकाच्या लागवडीतून आणि तेल निर्मिती व्यवसायातून आर्थिक कमाईची मोठी संधी आहे.

Jerenium Farming

जिरेनियम पिकाची लागवड कशी करतात

  • एक सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे जिरेनियमची लागवड मध्यम प्रतीच्या जमिनीवर आणि माळरानावर हे करता येते.
  • सर्वसाधारण 20 अंश सेल्सिअस ते 34 संशय सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते.
  • 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी किंवा 34 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात पिकांची वाढ खुंटते.
  • त्यामुळे पाहिजे तसे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही.
  • जिरेनियम पिकासाठी आद्रता पंच्याहत्तर ते 80% आवश्यक असते.
  • जिरेनियम पिकाची पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते अति पावसाच्या प्रदेशात याच्या फांद्या कुजण्याची जास्त शक्यता असते.
  • त्यामुळे पावसाळ्याआधीच कापणी करून घेतल्यास फारसे नुकसान होत नाही.
  • बाकीच्या ऋतूंमध्ये जिरेनियम पिकावर फारसा परिणाम होत नाही.
  • एकदा लागवड केल्यानंतर जिरेनियम पिकाची तीन वर्षे किंवा त्याहून अधिक वर्ष खोडवा पिके घेता येतात.
  • त्यामुळे जिरेनियम पिकासाठी शेतीची योग्य प्रकारे नांगरणी आणि मशागत करणे गरजेचे आहे.
  • मशागत केल्यानंतर बेड व्यवस्थित तयार करून घ्यावेत त्यावर ठिबक अंथरून चार बाय दीड फूट अंतरावर रोपांची लागवड करावी.
  • एका एकरामध्ये साधारण दहा हजाराच्या आसपास रोपे लागतात.
  • लागवडीनंतर पहिल्यांदा हे पीक चार महिन्यानंतर कापणी ला येते.
  • त्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला कापणी करता येते.
  • जिरेनियम लागवड केल्यानंतर वर्षाला एकरी 30 ते 40 किलो तेल मिळते.

प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये झाले जमा

Jerenium Farming मालाला बाजार भाव काय मिळतो

  • Jerenium Farming कापणी केल्यानंतर जिरेनियमच्या पालापासून उर्ध्वपातन पद्धतीने तेल काढले जाते.
  • सध्या एक लिटर तेलाला बाजारात 12000 ते 12500 रुपये दर मिळतो.
  • त्यामुळे एका वर्षाला एका एकरातून किमान चार ते पाच लाखांचे उत्पन्न सहज मिळते.
  • तयार झालेले तेल सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना थेट विकता येते.
  • बऱ्याचदा अनेक शेतकरी पुरेशा माहिती अभावीत एखादे पिक घेण्याचा प्रयत्न करतात आणि तोट्यात जातात.
  • त्याऐवजी शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी ते पिकाची लागवड कशी करावी आपले वातावरण त्या पिकासाठी योग्य आहे का त्यासाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न फायद्याचे आहे का तसेच तयार होणाऱ्या मालाला बाजारपेठ उपलब्ध आहे का याचा पुरेपूर अभ्यास करूनच त्या पिकाची लागवड करावी.
  • सध्या जिरेनियम तेलाला भारतात मोठी मागणी आहे.
  • दरवर्षी किमान 200 ते 300 टन तेल भारतीय बाजारपेठेत गरजेचे आहे.
  • परंतु भारतात दरवर्षी दहा ते वीस टणस ते निर्मिती होते त्यामुळे जिरेनियमची लागवड भारतीय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे.

Fake Rupee Notes :कश्या ओळखायच्या 500 आणि 2000 नोटा

Small Saving Scheme 2023 :महिलांसाठी नव्या व्याजदारसोबत नवी योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
7 thoughts on “Jerenium Farming :शेतकऱ्याला करोडपती करणारी शेती”

Leave a Reply

error: Content is protected !!