government schemes for farmers 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government schemes for farmers Mahadbt फार्मर स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांपैकी काही योजनांचा समावेश शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला योजनामध्ये करण्यात आला आहे. या मागेल त्याला योजनाच्या अंतर्गत अर्ज केलेल्या बहुतांश सर्वच शेतकऱ्यांना पात्र झाल्याचे एसएमएस देण्यात आले आहे. याची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आली आहे. अशा लाभार्थ्यांना पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर चुकीचे आहे, काहींच्या मोबाईलवर मेसेज प्राप्त झालेला नाही, काही शेतकऱ्यांना माहीत देखील नाही की योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र झाले आहे. असे लाभार्थी म्हणून पात्र झालेले बरेच शेतकरी लॉटरी कधी लागणार अशा प्रकारचे विचारणा करत आहे.

मागेल त्याला योजनांची किंवा महाडीबीटीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांची लाभार्थी यादी कशाप्रकारे पहायची जाणून घ्या.

government schemes for farmers 

आताच पहा यादीत आपले नाव

मागेल त्याला योजना

  • राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला योजनांच्या अंतर्गत मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला हरितगृह, मागेल त्याला फळबाग लागवड योजना चा लाभ, मागेल त्याला शेततळ्याचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला बीबीएफ यंत्र, मागेल त्याला ठिबक / तुषार सिंचन, अश्या विविध बाबीं करता अर्ज मागविण्यात आले होते.
  • मागेल त्याला योजनांच्या अंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची लॉटरी न लावता ज्या शेतकऱ्याने प्राधान्याने अर्ज केलेला आहे असे सर्व शेतकऱ्यांना निधीच्या प्रमाणामध्ये पात्र करून लाभ देण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले होते.
  • 29 ऑक्टोबर पासून लाभार्थ्याला पात्र करून त्यांचे पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पीक विमा अग्रीम 161 कोटीच वाटप

government schemes for farmers अशी पाहा लाभार्थ्यांनी यादी

  • लाभार्थी यादी पाहण्यासाठी गुगलच्या माध्यमातून mahadbt farmer login सर्च करू शकता याची डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.
  • पोर्टलवर आल्यानंतर लेफ्ट साईडला काही ऑप्शन आहेत ज्यामध्ये अर्जाची सद्यस्थिती तपासा आणि लाभार्थी यादी अशे ऑप्शन आहे.
  • यामध्ये लाभार्थी यादीवर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर लॉटरी यादी मध्ये आर्थिक वर्ष 2023-24 निवडा, योजनामध्ये योजना निवडा, त्यानंतर महिना निवडा, जिल्हा व तालुका सिलेक्ट केल्या नंतर शोधावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर अर्ज क्रमांक, अर्जदाराचे नाव, गाव, जिल्हा, तालुका, बाब, लॉटरी दिनांक, योजना अश्या फॉरमॅटमध्ये यादी दाखवली जाईल.

आताच पहा यादीत आपले नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

error: Content is protected !!