crop insurance app
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

crop insurance app राज्य शासनाच्या माध्यमातून 2023 मध्ये सर्व समावेशक पिक विमा योजना राबवली जात आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक रुपयांमध्ये पिक विमा उतरवण्यात आला आहे. हा शेतकऱ्यांचा हिस्सा राज्य शासनाच्या माध्यमातून 5 ऑक्टोबर 2023 रोजी पिक विमा कंपन्याला वितरित करण्यात आला आहे. ज्यासाठी 1034 कोटी रुपयांचा वितरण राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी हप्ता म्हणून पीक विमा कंपन्याला अनुदान स्वरूपामध्ये वितरित करण्यात आला आहे.

crop insurance app

पाहा लाभार्थीची यादी

बांध कोरणारे शेतकरी आयुष्यभर रडेल

12 ते 13 ऑक्टोबर नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम पिक विम्याची रक्कम जमा

  • जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील 11 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यासाठी 1071 कोटी रुपये या 11 जिल्ह्यांना वितरित करण्यात आले आहे.
  • जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय पिक विमा समितीच्या माध्यमातून अधिसूचना निर्मित करण्यात आल्या आहे. 5 सप्टेंबर पासून 22 सप्टेंबर पर्यंत निर्गमित करण्यात आले आहे.
  • एक महिन्यामध्ये पिक विमाचे वितरण होणे देखील आवश्यक आहे.
  • निधी वितरित झाल्यामुळे साधारणपणे 12 ते 13 ऑक्टोबर नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 25% अर्थात अग्रिम पिक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
  • साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळीची सुरुवात होते आणि दिवाळीच्या पार्श्वभूमी वर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
  • या पार्श्वभूमीवर पिक विमा कंपनीच्या माध्यमातून साधारणपणे 15 ऑक्टोबर ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा या कालावधीमध्ये अग्रिम पिक विम्याचे वाटप केल्या जाऊ शकते.

पिक विम्यासाठी पात्र 24 जिल्हे

  • पिक विमा साठी पात्र झालेल्या जिल्हे ज्यामध्ये नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, नागपूर आणि चंद्रपूर अशा या 24 जिल्ह्याचा पिक विमासाठी समावेश करण्यात आला आहे.

सोयाबीनच्या नुकसानीसाठी विमा मिळवण्याची शेवटची संधी

8 दिवसात शेतकऱ्यांना विमा न दिल्यास कंपन्यांवर कडक कारवाई

crop insurance app जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 11 पात्र जिल्हे

  • विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
  • अमरावती विभागातील या 5 जिल्ह्यासाठी 557 कोटी 26 लाख रुपये तर ज्या जमिनीकडून गेल्या आहे अशा जमिनीच्या नुकसानासाठी 78 कोटी 75 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
  • मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर 6 मराठवाड्यातील असे एकूण 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही 1071 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई वितरित केले जाणार आहे.

crop insurance app नुकसान भरपाई मिळण्यासाठी उशीर होऊ शकतो त्याची केवायसी प्रक्रिया, निधीचे वितरण हा कार्यकाल जास्त वेळ जाऊ शकतो. परंतु पिक विमासाठी शेतकरी दिवाळीपूर्वीच खात्यामध्ये रक्कम क्रेडिट केले जाऊ शकते. या जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढल्यानंतर बऱ्याच जिल्ह्यामध्ये जसे सोलापूर, लातूर, बीड किंवा अमरावती असे पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आले आहे. पात्र केलेली महसूल मंडळात कमी करण्यासंदर्भात त्यांच्या माध्यमातून वारंवार रक्षक नोंदवले जात आहे. 5 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. ज्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा व्यवस्थितपणे सर्वेक्षण करून हा आक्षेपाचा मुद्दा सोडवावा आणि पिक विमा कंपनीच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकऱ्यांना 25 टक्के पिक विमा वितरित करावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहे.


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading