best plan for monthly
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

best plan for monthly

best plan for monthly भारत सरकार आणि पोस्ट ऑफिस म्हणजे 100% सुरक्षित गुंतवणूक अशी ही गुंतवणूक किमान एक हजार रुपयांपासून सुरू करता येते. तसेच एक हजार रुपयांच्याच पटीमध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपये सिंगल अकाउंट मध्ये आणि 15 लाख रुपये जॉईंट खात्यामध्ये जमा करता येतात. जॉईन खाते मॅक्सिमम तीन लोकांना उघडता येते ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा शेअर एकसमान असायला पाहिजे म्हणजेच जॉईंट खात्याचे कमाल लिमिट 15 लाख रुपये ज्याचे तीन समान हिस्से केले तर प्रत्येक व्यक्तीचे नावे म्हणजे संयुक्त खातेदाराच्या नावे पाच लाख रुपये जमा करता येतील. त्यापेक्षा अधिक नाही योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम

  • best plan for monthly कोणत्याही भारतीय नागरिकाला तसेच मायनर किंवा अन साउंड माईंड च्या व्यक्तीच्या वतीने त्यांच्या पालकांना खाते उघडता येते.
  • तसेच जर दहा वर्षाहून अधिक वय असणारा मायनर ज्याला स्वतःच्या नावे खाते उघडून पैसे जमा करायचे आहे तर त्यासाठी सुद्धा यामध्ये प्रयोजन आहे.
  • पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम या योजनेचे खाते मुदतपूर्व बंद करता येते.
  • पण त्यासाठी अटी आहेत
best plan for monthly

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

best plan for monthly खाते बंद करण्यासाठीच्या अटी

  • ज्या दिवशी पैसे जमा केले त्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण होईपर्यंत खाते बंद करून पैसे काढता येत नाही.
  • पण एक वर्ष पूर्ण झाले असेल आणि तीन वर्षांपूर्वी खाते बंद केले तर जी काही जमा रक्कम असेल त्यातून दोन टक्के रक्कम कापून बाकीचे पैसे परत मिळतात.
  • याप्रमाणेच जर तीन वर्ष पूर्ण झाले आहे, पण पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच जर पैसे काढायचे असतील तर खाते बंद करण्यापूर्वी त्यातून एक टक्का रक्कम कापून घेतली जाईल आणि उरलेले पैसे परत मिळतील.
  • खाते बंद करण्यासाठी फॉर्म भरून त्यासोबत पोस्टाचे पासबुक संबंधित पोस्ट ऑफिस मध्ये जमा करणे अनिवार्य आहे.
  • खात्याची मॅच्युरिटी ही पाच वर्षांची आहे म्हणजे पैसे अडकल्यानंतर ते पाच वर्षानंतरच परत मिळतात.

जर अशी वेळ आली तर

  • best plan for monthly खाते बंद केले नाही पण खात्याची मुदत किंवा मॅच्युरिटी पूर्ण होण्यापूर्वी जर खातेदारकाचा मृत्यू झाला तर खात्यातील रक्कम खातेदारकाच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला परत मिळते.
  • अशा परिस्थितीमध्ये ज्या महिन्यांमध्ये नॉमिनीला पैसे परत केले जातात योजनेचे व्याज त्या महिन्यापर्यंत दिले जाते.
best plan for monthly

मिळवा घरबसल्या मिळवा जलद कर्ज

मिळणारे व्याजदर

  • पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अंतर्गत वार्षिक 7.4% व्याजदर दिला जातो.
  • या व्याजदरानुसार जनरेट होणारे व्याज हे प्रत्येक महिन्याला खातेधारकाच्या खात्यावर जमा केले जाते.
  • त्यामुळे खातेधारकाला नियमित मंथली इन्कम किंवा मासिक उत्पन्न मिळते.
  • तसेच मिळणाऱ्या व्याजावर खातेदारकाला आयकर विभागामार्फत टॅक्स आकारला जाऊ शकतो.
best plan for monthly योजना समजण्यासाठी सोपी पद्धत
  • सिंगल अकाउंट आणि जॉईन अकाऊंट या दोन्हीही खात्यांचे उदाहरण.
  • सिंगल अकाउंट
    • सिंगल अकाउंट मध्ये कमाल मर्यादा आहे नऊ लाख रुपयांची म्हणजे नऊ लाख रुपये जमा केले तर दर महिना 5550 रुपये व्याज पुढच्या पाच वर्षांसाठी मिळते.
    • म्हणजे पाच वर्षात एकूण 3 लाख 33 हजार रुपयांची कमाई व्याजामार्फत होते.
  • जॉईंट अकाउंट
    • best plan for monthly जॉईंट अकाउंट म्हणजे संयुक्त खात्यामध्ये 15 लाख रुपयांची कमाल मर्यादा आहे.
    • म्हणजे 15 लाख रुपये जमा करून दर महिना 9250 रुपये व्याज मिळते.
    • याचा अर्थ पाच वर्षात एकूण 5 लाख 55 हजार रुपयांची कमाई व्याजाद्वारे होते.

7th Pay Arrears :सातव्या वेतन आयोग थकीत हप्ते; या महिन्यात जमा होणार सर्व हप्ते ?

PM Suraksha Bima Yojana सिर्फ 20 रुपए खर्च करके 2 लाख रुपए का फायदा? किसे मिलेगा इस योजना का लाभ?


Discover more from Shetiyojana

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Discover more from Shetiyojana

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading